तुकारामांनी एका अभंगात अनुभवाचे वेगवेगळे पैलू काही उदाहरणांच्या आधारे स्पष्ट करून दाखविले आहेत. ते म्हणतात,
४१
लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री ! अग्नि टणत्कारीं दिसो येतो !!१!!
सांगावे ते काई सांगावे ते काई ? ! चित्ता होय ठायीं अनुभव तो !!२!!
अन्नें सांगो येतो तृप्तीचा अनुभव ! करूनि उपाव घेऊ हेवा !!३!!
तुका म्हणे मिळे जीवनीं जीवन ! तेथे कोणा कोण नाव ठेवी ? !!४!!
(अभंग क्र. ३१५२)
अग्नी निर्माण करण्यासाठी लोखंड कापूस गारगोटी यांसारखी साधनसामग्री सिद्ध असली, तरी त्यांचं घर्षण झाल्यानंतरच अग्नी प्रकट होतो. याचा अर्थ नुसती साधनसामग्री असून भागत नाही. तिचा योग्य रीतीनं प्रयत्नपूर्वक वापर केला, तरच आपल्याला हवं ते फळ मिळतं. या बाबतीत 'सांगावे ते काई' असा प्रश्न त्यांनी दोनदा विचारला आहे. याचा अर्थ अनुभवाचं महत्त्व कितीही सांगितलं, तरी ते वर्णन पूर्ण होऊ शकणार नाही, अशी त्यांची भावना आहे. साध्य प्राप्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा प्रयत्नपूर्वक वापर केल्यानंतरच फळ मिळतं, हा अनुभव आपल्या मनाला मिळतो, असं ते म्हणतात. अन्नाचं नुसतं वर्णन करून तृप्ती मिळत नाही. अन्नाचं भक्षण केलं, तर तृप्तीचा अनुभव येतो आणि मग त्या अनुभवाचं वर्णन करता येतं. हे एकदा कळलं, की आपण अन्न मिळविण्याचा उपाय करतो. जगामधे वेगवेगळ्या माणसांचा वेगवेगळ्या माणसांशी संपर्क येतो, लोक विविध पदार्थांच्याही संपर्कात येतात. अशा वेळी हा संपर्क एकमेकात मिसळून गेल्यासारखा अनुकूल झाला, तर जीवन आनंदी होतं. एकमेकांच्या संपर्कात येणारे लोक एकमेकांना समजून घेतात, एकमेकांवर प्रेम करतात. मग कोणी कोणाला नावं ठेवत नाहीत. दूषणं देत नाही. हा मनाला प्रसन्न करणारा ऐक्याचा उत्कट अनुभव असतो.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

No comments:
Post a Comment